आत्ताची मोठी बातमी! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, तणावाचं वातावरण

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणेने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत होतं. त्यावेऴी भाजप नेते मोहित कंबोज यांंचं नाव समोर आलं होतं.

शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मुंबईत मोठा राडा झाल्याचं पहायला मिळत आहे. मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मातोश्री निवास स्थानाजवळ हा हल्ला झाला.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी इशारा दिल्यानंतर मोहित कंबोज मातोश्री परिसराजवळ दिसले. मोहित कंबोज रेकी करण्यास आल्याचा दावा शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या इशाऱ्यानंतर आता शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेत्यांनी शिवसेेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता उद्या दिवसभरात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता! बंदुकीच्या धाकावर आमिर खानचं 70 लाखांचं घड्याळ लुटलं; CCTV फुटेज समोर

जाॅस द बाॅस! बटलरकडून दिल्लीच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण, वादळी शतक झळकावलं

भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…

“राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 चा पक्ष बनेल”

भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…