‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भोंग्याच्या मुद्द्याला हात घातलेला पहायला मिळाला.

भोंग्याच्या मुद्द्यवरुन औरंगाबादमध्येही राज ठाकरेंनी शेवटचा अल्टिमेटम दिला होता. यावरुन राज्यातील वातावरण ढवळून निघालं.

अद्यापही भोंग्याच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे. अशातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित गंभीर इशारा दिला आहे.

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;  सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावरही शेअर केलं आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ पहायला मिळत आहे.

4 मे रोजी भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

भोंगे उतरवा आंदोलनावरून गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे की मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी सुरु आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. यामुळे पुन्हा शिवसेना-मनसे वाद वाढण्याची शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  “बाॅलिवूडला मी परवडणार नाही”; महेश बाबूचं वक्तव्य चर्चेत

  “राज ठाकरे कोणी दबंग नेता नसून, उंदीर आहे उंदीर”

  “शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही”

  Gold-Silver Rate| सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर