विद्यार्थ्यांनी राजकारणात उतरुच नये- डॉ. अनिल काकोडकर

ठाणे | देशातील अनेक आंदोलने विद्यार्थ्यांनीच केली आहेत. त्यामुळे सध्या जे काही आंदोलनं होत आहे ते काही नवीन नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांनी राजकारणात उतरुच नये, असं स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिक काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे.

‘सूर्यकोटी समप्रभ दृष्टा अणुयंत्रिक- डॉ. अनिल काकोडकर’ या काकोडकर यांच्या जीवनावर आधारित चरित्रग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

विद्यार्थ्यांनी राजकारणात उतरु नये, याचा अर्थ असा नाही की त्यांनी गप्प बसावे, तर त्यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यक्त व्हावे, असंही ते म्हणाले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, आपण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूप मागे आहोत. नवनवीन तंत्रज्ञान आणि अणुउर्जा निर्माण करण्याच्या सामग्रीची देशाला मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-