कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं अमित शहांनीच सांगितलं- संजय राऊत

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशात चांगलाच गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायद्याला विरोध करण्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. पण शिवसेनेचे खासदार संजय  राऊत यांनी सरकारने कायदा करताना चूक केली असल्याचा दावा केला आहे. हा दावा त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माहितीच्या आधारे केला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकरावर निशाणा साधला आहे.

एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंब्याबरोरच देशभरातून या विधेयकाला विरोध करण्यात सुरु आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर आसामसह ईशान्येकडील राज्यातून तीव्र असंतोष उफाळून आला.

देशाचे गृहमंत्री नसताना अमित शाह म्हणायचे की, एका एका घुसखोराला निवडून निवडून बाहेर काढेल. आम्हाला ते चांगलं वाटलं. कारण बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढाव ही आमची इच्छा आहे. पण, मागच्या 6 महिन्यात त्यापैकी किती जणांना बाहेर काढण्यात आलं?, असा सवाल राऊतांनी केला आहे.

दुसरीकडं धार्मिक आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात, यावरही आमचा विश्वास आहे. अफगाणिस्तानमध्ये शीखांवर अन्याय होतो. तेव्हा त्यांना लोकांना भारतात यायचं असेल तर त्यांना स्वीकारणं आपलं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-