“14 एप्रिलला घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा”

मुंबई | 14 एप्रिल रोजी आपल्या घरावर रोषणाई करा, दिवे लावा मात्र सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम करू नका. मी दरवर्षी जयंती निमित्त देशभर, राज्यभर फिरत असतो. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे कुठेच जाणार नाही, असं  पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात, मिरवणुका काढून साजरी केली जाते. मात्र या वर्षीच्या जयंतीवर करोना वायरसचे सावट आहे. यामुळे यावर्षी जयंती साधेपणाने आणि प्रत्येकाने घरीच साजरी करावी, असं आवाहन जोगेंद्र कवाडे यांनी केलं आहे.

मी ही माझ्या संपूर्ण परिवारासोबत येणाऱ्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोरोनाच्या महामारीमुळे घरीच साजरी करणार आहे. तुम्हीही करा अशी विनंती करतो, असं जोगेंद्र कवाडे म्हणाले आहेत.

दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

-‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

-“मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान”

-14 एप्रिलनंतर ग्रामीण भागातली टाळेबंदी सरकारने उठवावी- राजू शेट्टी

-धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं पण…