सुक्या मेव्यातील अक्रोड आहे आरोग्यदायी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

अक्रोड हा सुक्यामेव्यातील एक घटक आहे. अक्रोडमध्‍ये भरपूर प्रमाणात पोषणतत्‍त्‍वे असतात. अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये केला जातो. अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला असतो. याशिवाय अक्रोडामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत.

अक्रोडचे आरोग्यदायी फायदे – 

1. अक्रोड हा पौष्टिक असल्याने शरीर कृश असलेल्यांनी व अशक्तपणा जाणवणाऱ्यांनी सकाळी उठल्याबरोबर 2-3 अक्रोड इतर सुक्या मेव्यासोबत खावेत.

2. अक्रोडाचे तेलदेखील त्वचा आणि केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. तसंच अक्रोडाच्या कच्चा फळापासून मुंरबा, चटणी, सरबत तयार केले जाते.

3. अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे कि विटामिन A, विटामिन B, विटामिन c, विटामिन B12, विटामिन D म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात. अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात.

4. अक्रोड हे सारक गुणधर्माचे असल्याने मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी अक्रोड नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या तेलामुळे व तंतुमय पदार्थांमुळे शौचास साफ होते.

5. अक्रोडातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या रोगापासून तुमचे रक्षण होऊ शकते. आजकाल या रोगाचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे जर तुम्हाला यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर दररोज सकाळी सुकामेवा सेवन करण्याची सवय लावा. सुकामेव्यामध्ये इतर पदार्थांसोबत अक्रोडाचा समावेश जरूर करा.

6. आपल्याला आपली त्वचा चमकदार व गोरी बनवायची असेल तर ४ अक्रोड २ चमचे ओटमील च्या सोबत दुधाच्या मलईत चागल्या प्रकारे मिळवून याची पेस्ट बनवा आणि याच्यात थोडा ऑलिव तेल मिळवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लाऊन ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे आपल्या त्वचेत चमक येईल. व आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर होतील.

7. अक्रोडामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहींनी अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.

8. शरीरावर ज्या ठिकाणी आपल्याला वेदना, आग होत असेल, आणि सुज आली असेल त्या ठिकाणी अक्रोड च्या सालाचा लेप लावा आपल्याला बरे वाटेल.

महत्वाच्या बातम्या –

“मोदी सरकारने मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”

….म्हणून आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रदर्शापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात…!

अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांच्या काळात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला, पण…- अशोक चव्हाण

मोठी बातमी; नाणाक प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरे यांना फोन, म्हणाले….