कोरोना इफेक्ट: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई |  कोरोना आणि लॉकडाऊमुळे एमपीएससीचा पेपर लांबणीवर पडला आहे. एमपीएससीची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

26 एप्रिल आणि 10 मे रोजी रोजी होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन्ही परीक्षा आता लॉकडाऊन स्थिती आणि एकूणच करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

या दोन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा परिस्थिती नियंत्रित आल्यावर पुढच्या काही काळात आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसंच परीक्षेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एस.एम.एस. द्वारे अवगत करण्यात येईल, असंही आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गाचं टेन्शन दूर झालं आहे. आयोगाच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर

-“हे आम्हाला हौस म्हणून नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय”

-आपल्याला- हनुमानासारखी पर्वत उचलायची नाहीत, जयंतीला घरीच थांबा- अजित पवार

-लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा चालू होणार का?; सरकारचा मसुदा तयार

-मोदी सरकारचं दुसरं आर्थिक पॅकेज; या क्षेत्रांना मिळणार मोठा दिलासा