दररोज Non-Veg खाणाऱ्यांनो… सावधान! कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका वाढतोय

नवी दिल्ली | सध्याच्या धावत्या जगात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडं पुर्णपणे लक्ष देणं शक्य होत नाही. परिणामी अनेक आजारांचा धोका वाढत आहे.

आजारांचा धोका वाढण्यास आहारामध्ये समाविष्ट केले जाणारे पदार्थ देखील कारणीभूत आहेत. अनेक संशोधकांनी यावर संशोधन केलं आहे.

शाकाहारी आणि मांसाहारी जेवण करण्याचे फायदे आणि तोटे हे नेहमीच आवडीनं चर्चिले जातात. अशातच आता संशोधकांच्या एका गटानं महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.

मांसाहार (Non-Veg) करणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणात शाकाहारी लोकांना कॅंन्सरचा धोका कमी असल्याचं या संशोधनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

जागतिक कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च युके आणि ऑक्सफर्ड पाॅपुलेशन हेल्थ यांच्याकडून संशोधन करण्यात आलं आहे. परिणामी सध्या या संशोधनाची चर्चा होत आहे.

45 हजार लोकांवर संशोधन करण्यात आलं आहे. दररोज मांसाहार करणारे, पाच दिवसात एकदा मांसाहार करणारे, मासे खाणारे आणि शाकाहारी असे दोन गट करण्यात आले आहेत.

नियमीत मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत कधीतर मांस खाणाऱ्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण 2 टक्के कमी आहे. मासे खाणाऱ्यांमध्ये 10 टक्के तर शाकाहारी व्यक्तींमध्ये 14 टक्के प्रमाण आहे.

नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 18 टक्के कमी होतं. शाकाहारी असणं हे कॅन्सरपासून लांब राहाण्यासाठी मदत करत, असंही या संशोधनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर