बहुप्रतिक्षित Toyota Glanza भारतीय बाजारात लाॅन्च; किंमत वाचून तुम्हालाही आनंद होईल

मुंबई | भारतात मो्ठ्या गाड्यांना मागणी असते. कोरोनानंतर ऑटोमोबाईल सेक्टरला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता हे सेक्टर स्थिरावल्याचं दिसतंय. (Toyota Glanza launches in the Indian market)

मागील 6 महिन्यात अनेक गाड्या लाॅन्च झाल्या आहेत. असातच आता बहुप्रतिक्षीत अशी Toyota Glanza नव्या रूपात बाजारात आली आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली प्रिमियम हॅचबॅक कार टोयोटा ग्लान्झाची अपग्रेडेड आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

Toyota Glanza कंपनीने चार ट्रिममध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये, ई व्हेरियंटची किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि हे फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतं.

याशिवाय, S व्हेरिएंटची किंमत 7.29 लाख रुपयांपासून सुरू होते, G व्हेरिएंटची किंमत 8.24 लाख रुपयांपासून सुरू होते आणि V व्हेरिएंटची किंमत 9.19 लाख रुपयांपासून सुरू होते.

Toyota ने Toyota Glanza चे बुकिंग सुरु केलीये. त्याची बुकिंग 11,000 रुपयांमध्ये करता येणार आहे. अनेकांनी या गाडी बूक देखील करून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, कंपनीने यावेळी लूक देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यात नवीन कॅमरी ग्रिल आहे. तर त्याच्या बंपरला स्पोर्टी लुक देण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तेव्हा दिल्लीतून सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले”, मोठा गौप्यस्फोट

 काळजी घ्या…! पुढील 3 दिवस अंगाची लाहीलाही होणार, राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

“…नंतर आमचा नाद करा”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय