Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वाद रंगला आहे. अशातच राज्यात ईडीनं मोठी छापेमारी केल्याची माहिती समोर येतं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या कार्यालयांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. परिणामी राज्यात गोंधळ उडाला आहे.

पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीजवर छापेमारी करण्यात आली आहे. पाटणकर यांच्यावर कारवाई झाल्यानं राज्यात वादाला सुरूवात झाली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे कुटुंबावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यात त्यांनी पाटणकर यांना घेरलं होतं.

पाटणकर यांच्या कंपनीची तब्बल 6 कोटी 45 लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या कार्यालयाकडून कारवाई केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाण्यात पुष्पक ग्रुपच्या 11 सदनिका आता सील करण्यात आल्या आहेत. परिणामी या कारवाईनं ठाकरेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

पाटणकर यांच्यावर आता मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्यांनी ईडीकडून स्पष्ट करण्याच्या अगोदर ट्विट करत ही माहिती सर्वांना दिली आहे.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”