मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत ईडीविरोधात हल्लाबोल केला आहे. त्यावेळी त्यांनी भाजपवर देखील घणाघाती टीका केली आहे.
शिवसेनेलाही धाड टाकण्याचा अधिकार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तुम्ही आमच्या घरी धाडी टाकली आम्ही तुमच्या घरी धाड टाकू, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. त्याविषयी 28 फेब्रुवारीला पत्र लिहिलं आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकीट मिळालं, असा आरोप देखील राऊतांनी केला आहे.
शिवसेना मोठा खुलासा करणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरावे देणार, असं संजय राऊत म्हणाले आहेत. जितेंद्र नवलानी हे ईडीचे अधिकारी आहेत. अनेक कंपन्यांनी या जितेंद्र नवलानी यांना पैसे पाठवले आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.
अविनाथ भोसले यांच्याकडून नवलानी यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. चार ईडी अधिकाऱ्यांविरोधात आम्ही माहिती मुंबई आयुक्तांना दिल्याची माहिती देखील राऊतांनी दिली आहे.
ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार, असं ठामपणे राऊतांनी सांगितलं आहे. त्यात भाजपचे नेते देखील सामिल असल्याचं त्यांनी सांगितली आहे.
देशातील सर्वांत मोठं करप्शन रॅकेट मुंबईत चालू आहे. ही फक्त 10 टक्के माहिती मी दिली आहे. किरीट सोमय्या ईडीचे पाचवे वसुली एजंट असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Maruti Suzuki Dzire CNG भारतीय बाजारात दाखल, मायलेज तर विचारूच नका…; पाहा किंमत
Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट
शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाची धाड!
निवडणुकीच्या निकालाआधीच काँग्रेस सावध; घेतला ‘हा’ मोठा निर्णय