YES बँकेच्या संस्थापकांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई | YES बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांना 31 तासाच्या दिर्घ चौकशीनंतर अमंलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे 4 वाजता अटक केली. त्यानंतर त्यांना 12 वाजता पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं. पीएमएलए न्यायालयाने त्याना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

राणा कपूर यांच्याविरोधात पैशांची अफरातफर अर्थात मनी लाॅन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन त्यांनी जवळच्या लोकांना कर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलं होतं. याबद्दल ईडीकडून चौकशी सुरु होती. शुक्रवारी रात्री  ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली. रात्रभर त्यांची चौकशी झाल्यनंतर, त्यांना ईडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी काल दुपारी 12 वाजता ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथे त्यांची 31 तास कसून चौकशी केल्यानंतर आज त्यांना ईडीची कोठडी सुनावन्यात आली असल्याची माहीती आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध आणले आहेत. येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात तोडावे लागतील- बच्चू कडू

-अरे देवा…यांनी तर तुम्हालाही रांगेत उभं केलं; प्रकाश राज यांची टीका

-महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव

-“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”

-महिला दिनी राज ठाकरेंच्या खास शैलीत शुभेच्छा