आपला पॅटर्नच वेगळा; मुळशीत लग्न लागताच गाड्या फटाक्यासारख्या पेटल्या!

पुणे | पुण्याजवळील मुळशी येथे एका लग्नसमारंभात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. लग्नसमारंभ पार पडल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडण्यात आल्याने ही आग लागल्याची माहिती आहे.

मुळशी तालुुक्यातील चाले दखने रोडवरील सुभद्रा मंगल कार्यालयातील ही घटना आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगीत एक स्कॉर्पिओ, एक बलेनो आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे बलोनो गाडीत एक चिमुकली झोपलेली होती, मात्र तिला वेळेत गाडीतून बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.

गाड्यांना आग लागल्याने वऱ्हाडी मंडळींमध्ये एकच हाहाःकार उडाला होता. खाली दिलेले व्हिडिओ पाहिल्यास या आगीच्या दाहकतेची कल्पना येऊ शकते. त्यामुळे लग्नसमारंभात फटाके फोडताना काळजी घ्यायला हवी हे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-YES बँकेच्या संस्थापकांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

-भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात तोडावे लागतील- बच्चू कडू

-अरे देवा…यांनी तर तुम्हालाही रांगेत उभं केलं; प्रकाश राज यांची टीका

-महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव

-“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”