मोठी बातमी! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा झटका, केली ‘ही’ कारवाई

मुंबई | ईडीने जॅकलिन फर्नांडिसची संपत्ती (Jacqueline Fernandez) जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

कॉनमन सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

200 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ED) ठग सुकेश चंद्रशेखरच्या चंद्रशेखर चौकशीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आलं. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत.

जॅकलीन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरसोबतचे (Sukesh Chandrashekhar) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी जॅकलिनला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अभिनेत्री नाराज झाली असून तिने चाहत्यांना खास आवाहनही केलं होतं.

मी सध्या खूप वाईट परस्थितीचा सामना करत आहे. माझी देखील काही प्रायव्हसी आहे, त्यामुळे माझे असले फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, असं आवाहन तिनं चाहत्यांना केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी पवार-गांधींकडे हिंदुत्व गहाण ठेवलं”

“तुम्ही तुटून पडा…,मी घरातून बुळबुळीत टोमणे मारेन”

“जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल” 

राणा दाम्पत्याबाबत मुंबई पोलिसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

राणा दाम्पत्याला मोठा झटका, महत्त्वाची माहिती समोर