“…तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चालत राहणार”, अजित पवारांच्या वक्तव्याची एकच चर्चा

मुंबई | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा नवीन राजकीय प्रयोग पहायला मिळाला. महाविकास आघाडीचं गणित राज्यात फिट बसलं आणि भाजपला मोठा धक्काच बसला.

सरकार स्थापन झाल्यानंतर देखील अनेक भाजप आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये संघर्ष पहायला मिळाले. एकमेकांविरोधात जोरदार टीका होऊ लागली. तर सरकार लवकर पडणार असं वारंवार भाजप नेते सांगत आहेत.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल, ती व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते हे लोकशाहीतलं सत्य आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

सरकार 3 महिन्यात जाईल, 6 महिन्यात जाईल, 9 महिन्यात जाईल, 12 महिन्यात जाईल, अशा तारखा दिल्या. असं करत करत आता अडीच वर्ष झाले, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला आहे.

सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या 3 नेत्यांचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, तोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार चालत राहील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवर देखील भाष्य केलं आहे. कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, त्यातून कुणाच्या भावना दुखावणार नाही हे पाहायला हवं, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा झटका, केली ‘ही’ कारवाई

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी पवार-गांधींकडे हिंदुत्व गहाण ठेवलं”

“तुम्ही तुटून पडा…,मी घरातून बुळबुळीत टोमणे मारेन”

“जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल” 

राणा दाम्पत्याबाबत मुंबई पोलिसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…