शिवसेनेत प्रवेश करणार का?; एकनाथ खडसे म्हणतात…

मुंबई |  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. त्याचबरोबर खडसे आमच्या कायम संपर्कात असतात, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. पत्रकारांनी याच मुद्द्यावर एकनाथ खडसे यांना विचारलं.

खडसेंनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मी भाजपचा ज्येष्ठ नेता आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं खडसे म्हणाले आहेत..

एकनाथ खडसे यांची स्वपक्षावरची नाराजी वारंवार दिसून आली आहे. तसेच खडसेंनी गेल्या काही दिवसांपासून भाजपला घरचा आहेर देण्याची एकही संधी सोडलेली नाही. म्हणूनच एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

दरम्यान, मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-