खडसे आणि फडणवीस एकाच दिवशी शनीशिंगणापूरला दर्शनासाठी एकत्र राजकीय चर्चाना आलं उधाण

अहमदनगर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल शनिशिंगणापूर येथे शनीचं दर्शन घेतलं. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल शनिशिंगणापूर येथे शनीचं दर्शन घेतलं. फडणवीस आणि खडसे यांनी एकाच दिवशी शनीचे दर्शन घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी संध्याकाळी शनिशिंगणापूर मंदिरात जाऊन शनीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी शनीची पुजाही केली.  तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास शनिशिंगणापूर येथे शनीचे दर्शन घेतलं. खडसेंनी यावेळी काही पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांवर टीकाही केली.

मी भाजपवर नाराज नाही. माझी नाराजी ही पक्षातीलच फडणवीसांच्या टीमवर आहे. मला संपविण्याचा झालेला प्रयत्न पक्षाची प्रतिमा मलीन करणारा आहे, अशी टीका एकनाथ खडसेंनी यावेळी केली आहे.

दरम्यान, मी योग्य वेळ आल्यावर माझ्या मनातील रोष व्यक्त करणार, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-