मुंबई | आदित्य यांनी भाजपला शिकवायची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेली लोक आहेत. आदित्य ठाकरेंना कायदा काय आहे ते माहित नाही. त्यांनी अगोदर मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडावी. त्यामध्ये काही कळतं का ते बघावे, नंतर भाजपवर बोलावं, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ट्विट केलं होतं. त्यांच्या ट्विटला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत नारायण राणे यांनी बोलणं टाळलं आहे. मनसे आणि भाजप युतीबाबत मी बोलणार नाही तर पक्षाचे प्रमुख बोलतील, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, मी कोणावर नाराज नाही. मला या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकत नाही कारण या सरकारला सिरीयस बेस नाही. या सरकारला राज्याचे प्रशासन आणि विकास कसा करायचा ते माहित नाही, असा टोला राणेंनी सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
देश संकटात आहे, पण यातून आपण नक्की बाहेर पडू- सुनिल गावस्कर – https://t.co/EMDh1NQTZA @GavaskarNDTV
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 12, 2020
“आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री मीच” – https://t.co/km4thdN6At @Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 12, 2020
“नरेंद्र मोदींनी त्यांच्या वडिलांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा जन्मदाखला दाखवावा” – https://t.co/2LOKDGeOMk @anuragkashyap72 @narendramodi @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 12, 2020