अखेर खडसेंना भाजपच्या अधिवेशनात पहिल्या रांगेत बसण्याची संधी!

मुंबई | भाजपचं नेरुळमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पाटील यांना महाराष्ट्र भाजपची सूत्रं हाती दिली. मात्र यावेळी भाजप नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्या रांगेत जागा मिळाली होती. मात्र नंतर प्रसारमाध्यमांनी वृत्त दाखवल्याने त्याची कुजबूज रंगली. आणि अखेर खडसेंना पहिल्या रांगेत बसवण्यात आलं.

या अधिवेशनात पक्षातर्फे काही राजकीय प्रस्तावही मांडण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते विनोद तावडे यांनी सत्तास्थापनेचा आणि ऑपरेशन लोटसचा आता काहीही संबंध नाही. येत्या काळामध्ये भाजप ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात मोठं आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-निवडणूक संपलीये, झालं गेलं विसरा… दिल्लीचे 2 कोटी नागरिक माझे कुटुंबीय- केजरीवाल

-दिल्लीच्या रामलीला मैदानावर केजरीवालांचं काळजाला हात घालणारं भावूक भाषण!