“निवडणूक संपलीये, झालं गेलं विसरा… दिल्लीचे 2 कोटी नागरिक माझे कुटुंबीय”

नवी दिल्ली |  भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसला धूळ चारत दिल्लीच्या विधानसभेत आपणच राजा असल्याचं सिद्ध केलेल्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज दुपारी बरोबर12. 15 वाजता त्यांनी रामलीला मैदानावर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर खोटेखानी भाषण केलं.  भारत माता की जय…. इन्कलाब जिंदाबाद… अशा घोषणांनी केजरीवालांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. उपस्थितांनी देखील त्यांना यावेळी मोठा प्रतिसाद दिला.

अरविंद केजरीवाल म्हणाले-

निवडणूक संपलीये, झालं गेलं विसरा… आपण कुणालाही मतदान दिलं असेल… आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात. आपण कुठल्याही पक्षाचे असा… आपण माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहात…. तुमचं काहीही काम असेल तर डायरेक्ट माझ्याकडे या… तुमचं काम करेन…

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले…

आपल्या मुलाने तिसरी वेळ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. ही माझी जीत नाहीये.. ही प्रत्येक दिल्लीकराची जीत आहे… ही दिल्लीच्या प्रत्येक आईची जीत आहे. दिल्लीच्या प्रत्येक बहिणीची जीत आहे. दिल्लीच्या प्रत्येक विद्यार्थ्याची जीत आहे. दिल्लीतल्या प्रत्येक परिवाराची जीत आहे. पाठीमागच्या 5 वर्षांपासून आमचा हाच प्रयत्न आहे की दिल्लीतल्या प्रत्येक परिवाराला दिलासा कसा मिळेल. आज तुम्ही आपल्या परिवाराला सांगा की आज आपल्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये.

दिल्लीसाठी आपल्याला खूप काम करायचंय. पण हे काम मी एकटा करणार नाही यासाठी मला तुमची साथ हवी आहे आणि ती साथ तुम्ही द्याल, अशी मी अपेक्षा करतो, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या रामलीला मैदानावर केजरीवालांचं काळजाला हात घालणारं भावूक भाषण!