मेगा भरतीमुळेच भाजपचं सरकार गेलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

जळगाव |  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या वळचणीला गेले होते. मात्र याने अनेक भाजपचे निष्ठावंत नेते नाराज झाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हीच खदखद बोलून दाखवली आहे. मेगा भरतीमुळेच भाजपचं सरकार गेलं, अशा शब्दात खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

भाजपच्या राज्य नेतृत्त्वाने आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मेगा भरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काही फरक पडत नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली, असं खडसे म्हणाले.

मेगा भरतीत आयात केलेल्या नेत्यांना तिकिटांची खैरात केली परंतू ज्यांना भाजपने तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले. मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बसला आहे, असंही खडसे म्हणाले.

दरम्यान, मेगाभरती ही भाजपची चूक होती, अशी कबुली खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-हौशे-नवशे-गवशे घेतले होते त्यांना हाकला; मेगाभरतीची चूक सुधारा- नवाब मलिक

-“भारतात पाकिस्तानी-बांगलादेशी घुसतात… मी बेळगावला का जाऊ शकत नाही, मी जाणारच”

-महाराष्ट्राचा मंत्री कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत म्हणतात, ‘पाहतोच आता!’

-लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

-भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण