धनंजय मुंडेंनी वाचला आपल्याच बहिणीच्या अपयशाचा पाढा

बीड | बीडचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी आज पहिली आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ३३६ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला आहे.

मागच्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर निधीपैकी फक्त ४० टक्के निधी मंजूर झाला आहे. त्यातील अनेक कामांना शासकीय मान्यताही नाही. अनेक कामांचे प्रस्तावही नाहीत, असं सांगून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंच्या अपयशाचा पाढा वाचला.

जिल्हा परिषदेच्या कामांना स्थगिती देऊन भाजपने नाकाबंदीही केली दीड कोटींची तरतूद असूनही असलेल्या औषधी खरेदीचा साधा प्रस्तावही नाही. तरीही त्या काळात त्या गोष्टी इतक्या सहज शक्य का झाल्या, असा सवारलही धनंजय मुंडेंनी यावेळी विचारला.

दरम्यान, रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या जळालेल्या ट्रान्सफार्मर २४ तासात देण्यात येईल, असं आश्वासनही मुंडेंनी यावेळी शेतकऱ्यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या- 

मेगा भरतीमुळेच भाजपचं सरकार गेलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

“…अन् दादा म्हणाले पोरींनो फोटोचं राहूद्या काही अडचणी असतीलं तर सांगा”

“सावरकरांच्या भारतरत्नला विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या कोठडीत पाठवा”

अरे येड्या…लवकर गेलास; लक्ष्याच्या आठवणीत अशोकमामा भावूक

अरे येड्या…लवकर गेलास; लक्ष्याच्या आठवणीत अशोकमामा भावूक