‘त्या’ गौप्यस्फोटानंतर खडसे-महाजन पहिल्यांदाच आमनेसामने

जळगाव | विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जळगाव शहर भाजप कार्यालयात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित आहेत. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात भाजप कार्यालयात बैठक होत असून यावेळी दोघे आमने-सामने आले आहेत.

एकनाथ खडसे यांनी आपलं तिकीट कापल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन यांच्यावर केला होता. यानंतर भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली. त्यांनतर पहिल्यांदाच दोघे आमने-सामने आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आपल्याला तिकीट न दिल्यानं माझ्यासह अजून दहा बारा जागांचं नुकसान पक्षाला सोसावं लागलं. एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई पक्षाचं नुकसान झाल्याचं सांगत खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. खडसेंनी पहिल्यांदाच भाजप नेत्यांवर थेट आरोप केला होता.

दरम्यान, नाथाभाऊंना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आम्ही असा कुठलाही विरोध केला नाही. हा तिकिट कापण्याचा निर्णय केंद्रीय कमिटीचा होता, असं गिरिश महाजन यांनी खडसेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-