अमरावती | मागील काही महिन्यांपासून राजकारणाचा स्थर खालावल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातील नेते खालच्या दर्जाच्या भाषेत एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असं घाणेरडे राजकारण आपण पाहिलं नाही. मी भाजपमध्ये देखील काम केलं, पण इतक्या खालच्या स्तरावरील हलकट राजकारण अनुभवलं नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
राजकारणात मतभेद आणि मनभेद असतात. पण मनभेद इतक्या टोकाला जातात हे आपण पवार साहेबांच्या घरावरील हल्ल्यानंतर अनुभवलं, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार तयार करून पवार साहेबांनी एका रात्रीत सगळं चित्र बदललं. सरकार दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचं देखील खडसेंनी यावेळी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका देखील केली आहे.
मी पुन्हा येईन हे आपण पाहिलं. मात्र मी पुन्हा मुख्यमंत्री होईल असं म्हणणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला, असंही टीका खडसे यांनी फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरासमोरील आंदोलनामागे भाजपचा हात असल्याचा आरोप देखील खडसे यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅटिंग करता करता आश्विनने सोडलं मैदान; IPL इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…
Sharad Pawar : “शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज…”
विमानात स्मृती इराणींना महिलेने महागाईवरून विचारले प्रश्न; पाहा विमानात काय काय झालं…
“कोरोना संपलेला नाही, आता तो पुन्हा…”; पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा
कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात तृप्ती देसाई आक्रमक; थेट गृहमंत्र्यांनाच पाठवले व्हिडीओ