बॅटिंग करता करता आश्विनने सोडलं मैदान; IPL इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…

मुंबई | IPL च्या 15 व्या हंगामातील 20 वा सामना आज लखनऊ सुपर जायन्टस आणि राजस्थान राॅयल्स या दोन तगड्या टीममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात एक वेगळीच घटना पहायला मिळाली.

फलंदाजी करत असताना राजस्थान राॅयल्सने एक धक्कादायक निर्णय घेतला. राजस्थानचे फलंदाज झटपट बाद झाल्याने गोलंदाजांना लवकर फलंदाजीला यावं लागलं.

आर आश्विनला फलंदाजीला आल्यावर राजस्थानची धावसंख्या खूप कमी होती. आश्विने हेटमायरसोबत सावध फलंदाजी सुरू केली. मात्र काही वेळानंतर आश्विनने हात मोकळे सोडले आणि फटकेबाजी सुरू केली.

अखेरच्या काही षटकामध्ये राजस्थानला मोठ्या धावसंख्येसाठी फटकेबाजी करण्याची गरज होती. त्यावेळी राजस्थानने मोठा निर्णय घेतला. राजस्थानने आश्विनला माघारी बोलवत रियान परागला मैदानात पाठवलं.

अश्विनने यावेळी 23 चेंडूंत 28 धावांची खेळी साकारली. आश्विनच्या जागी फलंदाजीसाठी आलेल्या परागने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. रियान परागने 4 चेंडूत 8 धावा केल्या.

दरम्यान, अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्यासाठी रियान परागला ओळखलं जातं. त्यामुळे राजस्थानच्या मॅनेजमेंटने निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं पहायला मिळाल्याने आता क्रिडाविश्वास चर्चांना उधाण आलंय.

पाहा व्हिडीओ-

 

महत्त्वाच्या बातम्या – 

Sharad Pawar : “शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज…”

विमानात स्मृती इराणींना महिलेने महागाईवरून विचारले प्रश्न; पाहा विमानात काय काय झालं…

“कोरोना संपलेला नाही, आता तो पुन्हा…”; पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा

कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात तृप्ती देसाई आक्रमक; थेट गृहमंत्र्यांनाच पाठवले व्हिडीओ

“गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही”