“गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब”

जळगाव | आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवरून हे नेते पुन्हा तापले आहेत. याची सुरूवात झाली गिरीश महाजन यांच्या आघाडी बैठकीवरून आणि बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून. हा वाद आता रोज वाढत चालला आहे.

याआधी गुलाबरावांनी खडसेंचा समाचार घेतला. त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी बाळ एकाचे, बारसं दुसऱ्याचे, आणि डफडं गुलाबरावांचं म्हणत निशाणा साधला आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चारी मुंड्या चित करेल नाहीतर गुलाबराव नाव लावणार नाही, असं वक्तव्य केलं होतं यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार करत गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचं नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका, असा इशाराही खडसेंनी दिलाय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसत आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे.

काही लोक माझ्याविषयी नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही, असं थेट चॅलेंज गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती अशी प्रतिक्रिया देत थेट एकनाथ खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या- 

“लक्षात ठेवा, गाठ धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र 

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! शिवसेनेने केली महिला आयोगाकडे तक्रार

 “सैन्य तयार ठेवा, 2024 मध्ये आपल्याला जिंकायचंय”

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 104 टक्के पाऊस होणार!

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…