“लक्षात ठेवा, गाठ धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

मुंबई | राज्यात सध्या भाजप आणि महाविकास आघाडीमधील सत्तासंघर्ष वाढलेला पहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सराकारला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

राज्यभरात गेल्या काही वर्षांमध्ये धनगर आरक्षणासाठी पडळकरांनी विविध बैठका घेतल्या आहेत. धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत परत एकदा ठाकरे सरकारवर पडळकरांनी शाब्दिक हल्ला केला आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दिलेलं आरक्षण या सरकारनं टिकवलं नाही, असं पडळकर म्हणाले आहेत. पडळकरांच्या टीकेनंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलं आहे. धनगर समजाच्या सक्षमीकरणाची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी 22 कल्याणकारी योजना आणि 1000 कोटी निधी दिला. प्रस्थापितांच्या सरकारनं या योजना गुंडाळल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली आहे.

काही घराण्यांची इच्छा आहे की माझ्या धनगर समाजाचा वापर सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा. मात्र, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिलंय.

दरम्यान, धनगर समाजाच्या तीन कोटी लोकसंख्येवर अन्याय होत असल्याचं पडळकरांनी यावेळी बोलू दाखवलं आहे. धनगरांना आश्वासन देऊ नये, अन्यथा अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असंही पडळकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! शिवसेनेने केली महिला आयोगाकडे तक्रार

 “सैन्य तयार ठेवा, 2024 मध्ये आपल्याला जिंकायचंय”

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 104 टक्के पाऊस होणार!

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

EPFO कडून खातेधारकांना अलर्ट जारी, तुम्हीही ‘या’ चुका करू नका