मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्वांसाठी सप्तसूत्री दिलेली आहे, जनतेने या सप्तसूत्रीचे पालन करावं, असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नागरिकांना केलं आहे.

आतापर्यंतचा अनुभव पाहता जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी कामे नसतानाही लोक बाहेर पडतात. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो, अशा स्वरुपामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या सप्तसूत्री लॉकडाऊन सूचनेचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावं, त्यामुळे कोरोना पळवण्यासाठी आपल्याला यश येईल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

ज्या ठिकाणी करोनाचे हॉटस्पॉट वाढणार नाहीत आणि जे भाग हॉटस्पॉट होण्याची शक्यता कमी असेल त्या भागात 20 एप्रिलपासून काही आवश्यक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आङे.

दरम्यान, व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्याच्या सर्व परवानग्या पुन्हा रद्द केल्या जातील. त्यामुळे बेजबाबदारपणा करू नका, इतरांनाही करू देऊ नका, अशा सूचनाही मोदींनी यावेळी देशवासियांना केल्या आहेत.