“गरिबांना 40 दिवस स्वत:च स्वत:ची सोय करण्यासाठी सोडलंय, पैसा,धान्य आहे पण सरकार ते देणार नाही”

नवी दिल्ली | देशव्यापी लॉकडाऊनच्या 21 व्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींनी आज केलेल्या भाषणावरून काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर  टीका केली आहे.

गरिबांना 40 दिवसांसाठी स्वत:च आपली सोय करण्यासाठी सोडलंय. पैसा आहे, धान्य आहे पण सरकार ते देणार नाही… रडा, माझ्या देशवासियांनो, असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

रघुराम राजन ते जिन ड्रेझ, प्रभात पटनायक ते अभिजित बॅनर्जी यांनी सुचवलेले अनेक सल्ले कचरापेटीत टाकण्यात आलेत असल्याचंही चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाल यांनीही मोदींच्या भाषणावर टीका केली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसशी लढण्याचा देशाचा रोडमॅप कुठंय? लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं, केवळ हाच नेतृत्वाचा अर्थ नाही तर देशाच्या नागरिकांसाठी सरकारनं उत्तरदायित्वाचं कर्तव्य पार पाडणं हेदेखील असतं, असं रणदीप सिंह सुरजेवाल यांनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-गॉगल लावून मदतीचे फोटो काढणं योग्य आहे का? राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

-“मोदींच्या घोषनेनंतर मला गहिवरून आलं अन् पुन्हा म्हटलं सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा….!”

-लॉकडाऊनची तारीख 3 मे हीच का?? पाहा त्यामागील काय आहे कारण…

-या ठिकाणचं लॉकडाऊन 20 एप्रिलला संपणार पण…- नरेंद्र मोदी

-“विश्वजीत कदमांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी घ्यावी”