जळगाव | पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला नसून त्यांना पाडण्यात आलं आहे, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलंय. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुध्द कारवाई करुन त्यांना पाडण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात झाला, असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या काळात वाढत्या पक्षांतर्गत कुरघोड्यांवर आळा घालणं गरजेचं आहे, अन्यथा याचा वाईट परिणाम पक्षावर होऊ शकतो. त्यासाठी मी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकत्यांची नावं दिली आहेत, मात्र अजूनतरी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. ती लवकर व्हावी अशी माझी अपेक्षा आहे, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.
पंकजा मुंडे यांचा पराभव हा असाच पक्षांतर्गत कटकारस्थानामुळे झाला. तसेच त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना पक्षातील काही व्यक्तींनीच मदत केल्याचा आरोप तेथील भाजपच्या स्थानिक कार्यकत्यांनी केलाय, असं खडसेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपला घरचा आहेर देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यांची स्वपक्षावर असलेली नाराजी वारंवार दिसून आली आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या –
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती?; शरद पवारांचा गौप्यस्फोट – https://t.co/VE2gxD7vCz @PawarSpeaks @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“देवेंद्र फडणवीसांवर दिल्लीतील अनेक नेते नाराज” – https://t.co/e9PxeP1Zii @PawarSpeaks @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
मनसेच्या एकमेव आमदारांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा – https://t.co/lCCanUYV4U @rajupatilmanase @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019