एकनाथ खडसे येत्या 48 तासात राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काही दिवसांपासून भाजप पक्षावर नाराज आहेत. आपल्याला डावललं जात असल्याची भावना त्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर खडसे येत्या 48 तासांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

एकनाथ खडसे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुुरु झाल्या आहेत.

खडसे दोन दिवस राज्याबाहेर राहणार आहेत. त्यांनतर ते राज्यात परत आल्यानंतर चर्चा करुन 20 डिसेंबरपर्यत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून खडसेंनी उघडउघड नाराजी व्यक्ती केली आहे. गोपीनाथ गडावरुन बोलताना त्यांनी माझा भरवसा धरु नका, असं म्हटलं होतं. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-