शिवसेना कोणाची खटला: शिंदे गटाची नवीन खेळी, शिवसेना अडचणीत

मुंबई | शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत घरोबा केला आणि राज्यात नवीन सरकार स्थापन केले.

त्यांच्या नवीन सरकार स्थापनेपूर्वी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती. या कारवाईला विरोध करत आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

यावेळी त्यांनी मूळ शिवसेना पक्ष आणि पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर देखील दावा सांगितला. त्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाच्या दफ्तरी हा खटला अद्याप प्रलंबीत आहे.

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांवर ‘तारीख पे तारीख’ खेळ सुरु आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना कोणाची यासाठी दोनही गटांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) निवडणूक आयोगाला कोणताही मोठा निर्णय न घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग सध्या शांत आहे. आता शिंदे गटाने नवी खेळी केली आहे.

त्यांनी निवडणूक आयोगाला या प्रलंबीत प्रकरणांत निकाल देण्याची परवानगी तातडिने देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 23 सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे.

परंतु आता शिंदे गटाने निवडणूक आयोगाने तातडीने आपला निर्णय घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भात विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

इलेक्ट्रीक वाहणांसाठी येत्या 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम; नितीन गडकरींची मोठी घोषणा

‘या’ शेअरमध्ये एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 2.65 कोटी, वाचा सविस्तर माहिती

75 वर्षात कसा बदलला भारतीय नौदलाचा ध्वज, जाणून घ्या सविस्तर माहिती

पुण्यात आता उडत्या बस!, Nitin Gadkari यांनी सांगितली भन्नाट योजना

INS Vikrant बद्दल ‘या’ 10 गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहितच हव्यात, अभिमान वाटेल!