उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय बेकायदेशीर म्हणत एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा!

मुंबई | आम्ही हिंदुत्वाच्या विचाराने, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना घेऊन पुढे जातोय. महाविकास आघाडीसोबत जाताना अनेकांनी मला सांगितलं होतं, की हे चुकीचं आहे. मात्र पक्षप्रमुखांचा आदेश आम्ही पाळला. नामांतरण चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं आहे. उद्या आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन हा निर्णय पुन्हा घेणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी आज मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी शहरातील रविंद्रनाट्य मंदिर येथे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय आम्ही उद्या कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. 200-300 निर्णय घेतले ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन या निर्णयांवर शिक्कामोर्तब करू, असं शिंदेंनी सांगितलंय.

सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. दोनशे तिनशे निर्णय घेतले ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. उद्या कॅबिनेट घेऊन नामांतराच्या शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

आम्ही संयम बाळगत होतो, इकडे चर्चा करायची आणि तिकडे पदावरून काढायचे. माझ्या घरावर दगडफेक करण्यास सांगितले पण वेळ आली तेव्हा सगळे मागे आले. एकनाथ शिंदेंना तुम्ही हलका समजला का?, असा सवालही त्यांनी केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी होताना चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर डोक्यातून मुख्यमंत्री होण्याचा विचार काढला, असं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील” 

भगवी शाल आणि औक्षणासोबत फडणवीसांचं शिवतीर्थावर स्वागत, पाहा फोटो 

‘… त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते, बिचारे मुख्यमंत्री’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या आधी ‘या’ बंडखोर आमदाराचं नाव, शिवसेनेचा खुलासा

‘शरद पवारांवर आरोप करून केसरकरांनी स्वत:च्याच बनियनमध्ये खळबळ माजवली’, शिवसेनेचा घणाघात