सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या प्रताप पोथेन (Pratap Pothen) यांचे निधन झालं. राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला.

प्रताप बोथेन यांनी मार्थंडन आणि शिवलापेरी पांडी या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी अशा भाषांमधील 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. प्रताप पोथेन यांनी पन्नीर पुष्पमंगल, आलियाथा गोलामंगल, मुदु बानी या तमिळ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

ही बातमी समोर येताच त्याचे चाहते आणि मित्रांना धक्का बसला आहे. शुक्रवार, 15 जुलै रोजी अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या घरी सापडला आहे.

या प्रकरणात अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अभिनेता काही दिवसांपासून आजारी होता. अशा परिस्थितीत त्यांचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रताप बोथन यांनी मार्तंडन आणि शिवलापेरी पांदीसह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमधील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रताप पोतेंनी 1985 मध्ये मीडम ओरू कथल कथा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात एका मानसिक आजारी जोडप्याची कथा दाखवण्यात आली होती. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी मल्याळम भाषेतील तीन चित्रपट दिग्दर्शित केलेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय बेकायदेशीर म्हणत एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा! 

“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील” 

भगवी शाल आणि औक्षणासोबत फडणवीसांचं शिवतीर्थावर स्वागत, पाहा फोटो 

‘… त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते, बिचारे मुख्यमंत्री’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या आधी ‘या’ बंडखोर आमदाराचं नाव, शिवसेनेचा खुलासा