अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या गुप्त बैठकीत फडणवीसांना डावललं?, चर्चांना उधाण

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सत्तापालट झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील 40 आमदार फोडले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षासोबत आपल्या गटाची युती करत सरकार स्थापन केले.

शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीत भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांच्या पक्षात 105 आमदार असून शिंदे यांच्या गोटात फक्त 40 आमदार आहेत. तरी देखील 105 आमदारांच्या पक्षाच्या नेत्याला दुय्यम पद मिळाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर अन्याय झाला, असे विरोधी पक्षातील लोक बोलत होते. ते मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांनतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठका घेतल्या.

एकनाथ शिंदे यांनी पाच दौरे करुन देखील त्यांची गाडी अजून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचली नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरुन आता एक नवीन माहिती समोर येत आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात येणार आहे का? अशी आता चर्चा सुरु आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उशिरा एकट्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यात त्यांच्यात खाते वाटपाची चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) 1 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराला हात घातला जाणार आहे. 18 मंत्रीपदे शिंदे गटाला मिळावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली.

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर आता महिना होईल, तरी मंत्रीमंडळ विस्तार नाही की खाते वाटप नाही. त्यामुळे विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सुुरुवातीला आम्ही मंत्रिपदांसाठी पक्ष सोडला नाही असे म्हणणारे आता मंत्रिपदासाठी दिल्ली दौरे करत आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”