“हिंमत असेल तर माझ्याशी लढा अन् युक्रेनला…”, Elon Muskचं पुतिनला ओपन चॅलेंज!

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात चालू असलेल्या युद्धात आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळतंय. अमेरिका थेट उद्धात नसली तरी अमेरिकेच्या अनेक कंपन्या युक्रेनला मदत करत असल्याचा दाना रशियाने केला आहे.

अशातच आता मोठमोठ्या युवा उद्योजकांचे चाहते आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव असलेल्या एलाॅन मस्कने (Elon Musk) रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादेमीर पुतीन यांनी थेट आव्हान दिलं आहे.

रशियन हल्ल्यात युक्रेनची हजारहून अधिक नागरिक मारले गेल्याची बातमी आली होती. त्यावरून एलाॅन मस्कला संताप अनावर झाला आणि त्यांनी ट्विट करत थेट पुतीनला चॅलेंज दिलं आहे.

मी पुतीनला आमने सामने लढाईचं आव्हान देतो. युक्रेन निशाण्यार असेल, असं एलाॅन मस्क म्हणाला आहे. मस्कने पुतीनचे नाव रशियन भाषेत लिहिले होते, तर युक्रेनचे नाव युक्रेनियनमध्ये लिहिले होते.

सध्या मस्कचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. तुम्ही लढायला तयार आहात का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत स्टारलिंक उपग्रहाच्या मदतीने युक्रेनमध्ये इंटरनेट आण्याचं काम केलं आहे. त्यामुळे युक्रेनला या युद्धात मोठी मदत देखील मिळत आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये मस्कने रशियाच्या अध्यक्षांना म्हणजेच महल क्रेमलिन यांनाही टॅग केलं आहे. यावर आता रशिया काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

पाहा ट्विट-


महत्त्वाच्या बातम्या – 

Russia Ukraine War: रशियाने दिली भारताला मोठी ऑफर, मोदी सरकारच्या निर्णयावर जगाचं लक्ष लागलं!

‘CBI नाही तर CID चौकशी करणार’, गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचा सभात्याग

 …अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ