काय सांगता! तहसीलदारानं बजावली चक्क देवालाच नोटीस; झालं असं की…

रायगढ | भारत हा लोकशाही देश आहे. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. न्यायव्यवस्था ही लोकशाहीच्या प्रमुख स्तंभापैकी एक आहे.

देशात धर्मावरून आणि देवावरून अनेकदा वाद उद्भवले आहेत. देव, धर्म आणि राजकारण यामुळे मोठमोठे न्यायालयीन प्रकरणे देखील ऐकायला मिळतात. अशातच आता एक नवीन वाद समोर आला आहे.

छत्तीसगढमधील रायगढ शहरातील मंदिरालाच म्हणजेच देवालाच नोटीस बजावल्याची घटना समोर आली आहे. परिणामी सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रायगढ शहरातील वार्ड क्र. 25 मध्ये एक शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर ज्या जागेवर आहे ती जागा बेकायदेशीर पद्धतीनं बळकावल्याची याचिका सुधा राजवाडे या महिलेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

राजवाडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं या प्रकरणात तहसीलदारांनी तपास करण्याचा निर्णय दिला होता. परिणामी तहसीलदारांंनी पुढील कारवाई केली आहे.

राजवाडे यांच्या तक्रारीनंतर जमीन नावे असलेल्या 10 जणांवर कारवाई करण्यात आली होती. यात शिवमंदिराच्या नावाने देखील जमीन आहे. त्यामुळे मंदिराला देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

मंदिराला नोटी पाठवल्याने आता स्वत: देव कोर्टात हजर राहणार का?, असा सवाल आता स्थानिक नागरिक करत आहेत. तर आता रायगढमध्ये एकच चर्चा देखील सुरू आहे.

सदरील प्रकरण हे सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर ताब्यात असल्यानं आम्ही नोटीस पाठवल्याचं तहसीलदार गगन शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नोटीस दिल्यानंतर 10 दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. मुदतीनंतर पुढील कारवाई करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 …अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ 

‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण 

“शरद पवारांच्या हिंमतीने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं”