राष्ट्राध्यक्ष फरार, नागरिक रस्त्यावर; श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक संकटांचा सामना करत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि महागाईला कंटाळून श्रीलंकन नागरिक रस्त्यावर उतरले.

अनेक महिन्यांपासून श्रीलंकेतील लोकांना अन्न, औषधं, इंधन यासारख्या मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर श्रीलंका ज्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे त्यासाठी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे जबाबदार असल्याचं श्रीलंकेतील नागरिकांचं मत आहे.

श्रीलंकेत जनक्षोभ उसळला असताना गोटाबाया यांनी देश सोडून पलायल केल्याची माहिती समोर आली. राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर न्यायलयीन कारवाईपासून बचाव करण्यासाठी राजपक्षे त्यांची पत्नी व दोन अंगरक्षकांसह मालदीवला फरार झाले असल्याचं म्हटलं जात आहे.

देशातील एकंदर परिस्थिती बघता राजधानी कोलंबोमध्ये नागरिकांनी हिंसक आंदोलन सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तर श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हजारो आंदोलक पंतप्रधान कार्यालयाकडे चाल करत आहेत. त्यामुळे जमावाला रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या जात असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, आर्थिक संकट, जनक्षोभ यामुळे श्रीलंकेत अराजकता पसरली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय संभाजीमहाराजांच्या प्रेमापोटी नाही तर..’, इम्तियाज जलील आक्रमक

‘शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा होत होता’, बंडखोर आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

“राजनाथ सिंहांना मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून उद्धव ठाकरेंना लागला”

‘राजनाथ सिंहांचा फोन आला आणि म्हणाले अस्सलाम वालेकुम’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

‘मला ईडी आली नाही पण फक्त…’, बंडखोरीनंतर शीतल म्हात्रेंचं स्पष्टीकरण