‘औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय संभाजीमहाराजांच्या प्रेमापोटी नाही तर..’, इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबाद | महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर, उस्मानाबादचं धाराशीव नामांतर व नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी मंजूर केला होता.

उद्धव ठाकरेंच्या या तीन महत्त्वपूर्ण निर्णयावर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, औरंगाबादच्या नामांतर मुद्द्याला एमआयएमकडून कडाडून विरोध होत आहे.

औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील रस्त्यावर उतरले आहेत. एमआयने भरपावसात भडखल गेट ते आमखास मैदानापर्यंत मोर्चा काढत नामांतराच्या निर्णयाला विरोध केला. तर यावेळी जलील यांनी भाजप व सेनेवर सडकून टीका केली आहे.

चांगला वाईट कसाही असला तर इतिहास आहे. त्यामुळे काहीही झालं तरी औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही, असा पुनरूच्चार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. औरंगाबदच्या नामांतराचा निर्णय छत्रपती संभाजीमहाराजांच्या प्रेमापोटी नाही तर खुर्ची हालायला लागली म्हणून घेण्यात आला आहे, असा घणाघात जलील यांनी केला आहे.

फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय अवैध असून आम्ही पुन्हा निर्णय घेऊ. मग शिवसेना-भाजपची सत्ता असताना का नामांतराचा निर्णय घेण्यात आला नाही?, असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तीस वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आले व त्यांनी शहराचे नाव बदला म्हणून सांगितले. त्यांनी सांगितले म्हणून शहराचे नाव बदलता येणार नाही, अशी आक्रमक भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा होत होता’, बंडखोर आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

“राजनाथ सिंहांना मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून उद्धव ठाकरेंना लागला”

‘राजनाथ सिंहांचा फोन आला आणि म्हणाले अस्सलाम वालेकुम’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

‘मला ईडी आली नाही पण फक्त…’, बंडखोरीनंतर शीतल म्हात्रेंचं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा मोठा दावा, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ