प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त

मुंबई | प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती शहाणे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. सध्या या शहाणे यांच्या या पोस्टची चर्चा चालू आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली आहे. अपघातानंतर आपण सुरक्षित आहोत असं किशोरी शहाणे यांनी फेसबूकच पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

माझ्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवानं आम्ही सुखरूप आहोत. देवाच्या कृपेनं आमचा जीव वाचला आहे, असं किशोरी शहाणे यांनी म्हटलं आहे.

जाको राखे साईया मार सके ना कोई, असंही किशोही शहाणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. किशोरी शहाणे या आपल्या एका कार्यक्रमासाठी जात होत्या. कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला आहे.

सदरील अपघाताता कसलीही जिवीत हानी झाली नाही. किशोरी पेडणेकर यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या गाडीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे. परिणामी हा अपघात गंभीर असल्याची चर्चा आहे.

किशोरी शहाणे यांना चित्रपटसृष्टीतील एक चर्चित चेहरा म्हणून ओळखण्यात येतं. शहाणे यांनी अनेक बहारदार चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. परिणामी त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे.

किशोरी शहाणे यांच्या गाडीच्या अपघातानंतर अफवा पसरू नयेत म्हणून त्यांनी लगेच पोस्ट केली आहे. किशोरी शहाणे आणि इतर सदस्य सुखरूप असल्यानं सर्वांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, किशोरी शहाणे यांनी माहेरची साडी या मराठी सिनेमानं अमाप प्रसिद्धी मिळवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी आलेला शहाणे यांचा क्लासमेट हा सिनेमाही गाजला होता. शहाणे या बिग बाॅस मराठीमध्येही सामिल झाल्या होत्या.

पाहा पोस्ट – 

महत्त्वाच्या बातम्या –

 ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू

“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

 आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

 मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती