पुणेकरांनी प्रस्ताव दिल्यास हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स दिवस रात्र सुरू ठेऊ- आदित्य ठाकरे

पुणे | पुणेकरांनी प्रस्ताव दिल्यास हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स दिवस रात्र सुरू ठेऊ, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. गेले अनेक वर्ष आदित्य यांनी मुंबईतलं नाईट लाईफचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता पुण्यातूनही प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार करणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही आनंदाची बाब आहे, अशी चर्चा आता होत आहे.

मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे नाईट लाईफ अंतर्गत चोवीस तास सुरु ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे 24 चालू ठेवण्यास परवानगी आहे.

दरम्यान, नाईट लाईफवर आता पुणेकर नागरिकांचं काय मत आहे? ते नाईट लाईफसाठीसाठी प्रस्ताव देऊऩ पाठिंबा देणार की? पाश्चात्य संस्कृती म्हणून विरोध करणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचे कपिल सिब्बल म्हणतात CAA सर्व राज्यात लागू केलचं पाहिजे

-“गांधी कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान करायचे होते म्हणूनच देशाची फाळणी झाली”

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पा तुम्ही एकत्र बसा आणि हा प्रश्न कायमचा सोडवून टाका”

-पप्पा तुम्ही लवकर परत या…; चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा हृदयद्रावक निबंध व्हायरल

-“कलम 370 हटवून काश्मीरप्रश्न संपवला… मग सीमाप्रश्न सोडवायला काय अडचण आहे??”