भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रभाव!

जगभरातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातही कोरोना बाधीत रूग्णांची संख्या जवळपास 3 लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे. लाॅकडाऊन शिथील झाल्यावर भारताचा कोरोना संक्रमित रूग्णांचा आलेख तिव्र चढत्या स्वरूपाचा राहिला आहे. ही नक्कीच धोक्याची बाब समजली जाते. मात्र या काळातही भारतासाठी एक दिलासा देणारी बातमी समोरं आली आहे.

Ujjain Corona

कोरोना संक्रमितांचा आलेख वेगाने वाढत असला तरी सप्टेंबरच्या दरम्यान या आलेखाचा वेग मंदावल्याचं पहायला मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सदस्यांनी गणितीय विश्लेषणाच्या आधाराने हा नवा युक्तिवाद केला आहे. भारतात कोरोना बरा झालेल्या रूग्णांचा आकडा हा बाधीत रूग्णांपेक्षा अधिक असल्याच ताज्या आकडेवारीनूसार समोर आलं आहे. यामुळे भारतातील कोरोनाचा पुढील प्रवास कोरोनामुक्ती मिळवण्याकडे राहीलं असही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

plazma therapy 1

अहवालानुसार, भारतात कोरोना संक्रमणाच्या टप्प्यात बरीच सुधारणा झाल्याचं पहायला मिळत आहे. हा निष्कर्ष काढण्यासाठी संशोधकांनी गणितीय बॅली माॅडेलचा वापर केला आहे. या माॅडेलनुसार एखादा आजार संपण्याच्या मार्गावर आहे अस तेव्हा समजलं जात. जेव्हा आजाराने बाधित झालेल्या रूग्णांच्या संख्येएवढे रूग्ण या आजारातून बरे होतील किंवा त्यांचा मृत्यू होईल. भारतात ही परिस्थिती आजमितीस पहायला मिळत आहे.

corona

 

केंद्रीय आरोग्य महासंचालनालयातील उप महासंचालक डाॅ. अनिल कुमार आणि सहाय्यक उपमहासंचालिका डाॅ. रूपाली राॅय यांनी संयुक्तपणे हा शोधनिबंध सादर केला. हा अभ्यास अहवाल Epidemiology International Journal मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनासाठी 1 ते 19 मे दरम्यानच्या आकडेवारीचा वापर करण्यात आला होता.

Corona 5 1

या काळात 1,06,475 कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा तर 42306 रूग्ण कोरोनातून बरे झाले होते. या आकडेवारीचा पडताळणी करण्यासाठी बॅली माॅडेल नुसार BMRRR दर काढला जातो.हा दर 19 मे रोजी 42% होता. याचा अर्थ कोरोनापासून बरे होणारे रूग्ण हे बाधित रूग्णांच्या जवळपास निम्म्या पातळीवर असल्याचं निष्कर्षात आढळून आल.

Mask

विशेष बाब म्हणजे ताज्या आकडेवारीनुसार कोरोना बाधीत रूग्ण 2,97,735 असून बरे झालेल्या रूग्णांचा आकडा 1,41,028 असा आहे. आजमितीस बॅली माॅडेल नुसार हा दर त्यामानाने चांगला वधारला आहे. भारतासाठी ही नक्कीच सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

Corona 7

कोरोना बाधीत रूग्ण व बरे होणारे रूग्णांची आकडेवारी समसमान असून चालणार नाही. यासाठी पुरेशी आरोग्य सुविधा, भविष्यात येणारी लस, सुयोग्य प्रशासकीय यंत्रणा आणि बाधितांवर उपचार हे टप्पेही महत्वपूर्ण असणार आहेत. या बाबींचा विचार करता कोरोनाचा हा आलेख चढत्या भाजणीवर ठेवायचा की कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करायची यासाठी सरकार व प्रशासनाचा चांगलाच कस लागणार आहे.

Corona 10

भारतात लाॅकडाऊन शिथील केला गेल्यानं सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या झुंबडी उडाल्या आहेत. आरोग्य व पोलिस प्रशासन यंत्रणाही हतबल झाली आहे. टाळेबंदीच्या काळातील आर्थिक हानीचा विचार करता बरेच उद्योग व्यवसायही सुरू करणं क्रमप्राप्त आहे. या परिस्थितीकडं पाहता बॅली माॅडेलवर आधारित हा अहवाल योग्य ठरेल की नाही हा येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या-

-“गेली तीन महिने सतत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान”

-…म्हणून महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला- बबनराव लोणीकर

-मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे

-‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

-“बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांना विश्वासात घेऊनच काम होतंय”