“गेली तीन महिने सतत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान”

पुणे | सीमेवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पोलिसांचं कौतुक केलं आहे.

पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला अजित पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करत उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल अजित पवारांनी पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं. कर्तव्य बजावत असताना स्वच्छता, सुरक्षिततेची काळजी घ्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील पोलीसांनी संवेदनशीलता दाखवत कोरोना नियंत्रणासाठी निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढच्या काळातही सर्वांच्या एकजुटीतून कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करण्याचा निर्धार करुया, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला- बबनराव लोणीकर

-मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे

-‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

-“बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांना विश्वासात घेऊनच काम होतंय”

-राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस