काँग्रेस नेत्यानं गर्लफ्रेंडला दिलेल्या ‘या’ अनोख्या गिफ्टची सगळीकडं चर्चा; वाचा काय आहे हे गिफ्ट

अलिकडच्या काळात ‘व्हॅलेटाईन डे’ साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि 14 फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. या आठवड्यात प्रियकर-प्रेयसी एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशातच काँग्रेसच्या एका नेत्यानं आपल्या गर्लफ्रेंडला दिलेल्या गिफ्टची सगळीकडंच चर्चा होतं आहे.

काॅंग्रेसच्या या नेत्यानं आपल्या गर्लफ्रेंडला काय गिफ्ट दिलं असेल याविषयी जोरदार चर्चा होत आहे. या नेत्यानं आपल्या गर्लफ्रेंडला साधंसुध गिफ्ट न देता थेट निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

अहमदाबादमध्ये महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अधिकृत यादी जाहीर करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसनं निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मिळालेल्या माहितानुसार, काॅंग्रेसच्या  एका वरिष्ठ नेत्यानं थेट आपल्या गर्लफ्रेंडला हे तिकीट मिळवून दिलं.

असं बोललं जातंय की, हा वरिष्ठ नेता प्रेमात आहे. त्यामुळे त्यानं आपल्या गर्लफ्रेंडसाठी हे खास गिफ्ट दिलं आहे. हे तिकीट मिळवून देण्यासाठी त्यानी भरपूर प्रयत्न केले. अखेर ते गर्लफ्रेंडला तिकीट मिळवून देण्यात यशस्वी ठरले.

1 फेब्रुवारीला काँग्रेसनं सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगर महानगरपालिकांच्या काही प्रभागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. 6 महानगरपालिकांच्या निवडणुका 21 फेब्रुवारी रोजी होणार असून 28 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 28 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होईल. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये एएमसी अंतर्गत गोटा, चांदलोडिया, राणीप, नवा वदज, घाटलोडिया, थलतेज, नारायणपुरा, नरोदा, नवरंगपुरा आणि वसना प्रभागातील उमेदवारांची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या –

अंकिता लोखंडे म्हणते ‘धकधक करने लगा’, पाहा नेमकं काय झालंय!

गंदी बात! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडीओ, पोलिसांनी केली अटक

बिबट्यानं मगरीला जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं, शेवटी…; ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल

जाणून घ्या मनुका खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

याच महिन्यात लाँच होणार मारुतीची ही बेस्ट सेलिंग कार; केलेत हे महत्त्वाचे बदल!