दररोज लवंग खाण्यानं होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे लवंगशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच. भारतीय खाद्यपदार्थात मसाला म्हणूनही लवंगचा वापर केला जातो. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत.

अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर लवंगीचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे आणि याचे परिणाम देखील प्रभावशाली आणि जलद दिसून येतात.

लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना गुणकारी आहे. लवंग अग्निप्रदीपक, पोटदुखी, तहान, खोकला, कफ, दमा, उचकी, क्षय, मुखदरुगधी, उलटी, पोटदुखी, रक्तविकार इत्यादींवर काम करते.

दातांमध्ये अचानक कधी कधी वेदना सुरु होतात त्यावेळी लवंगचा वापर केल्याने आराम मिळतो. यासाठी एक कप पाण्यात लवंग चांगल्या रीतीने पाण्यात उकळवून घ्यावी आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. आठवड्यातून तीन ते चार वेळेस ही प्रक्रिया केल्यास दातांमधील वेदना जलद गतीने नाहीश्या होतात.

लवंगमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. म्हणूनच, आरोग्य तज्ज्ञांनी त्यास अन्नात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. एक चमचे लवंगामध्ये दररोज आवश्यक असलेल्या 6 कॅलरी आणि 55 टक्के मॅंगनीज असतात. मेंदूचे कार्य योग्यप्रकारे सुरु ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी मॅंगनीज खूप महत्वाचे आहे.

लवंगात असलेल्या अॅटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे इंनफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो.

लवंगामध्ये आढळणारी संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करतात. यामध्ये सापडलेला नाय.जीरिसिन हा एक महत्त्वाचा घटक, मधुमेहावरील रामबाण उपाय असून, पेशी सुधारण्यास मदत करतो. यामुळे, मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

लवंग इन्फ्लेमेशनशी लढण्यासाठीही उपयुक्त आहे. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो जो शरीरात अॅटिइन्फ्लमेटरी एजेंटप्रमाणे काम करतो. हा घटक इन्फ्लमेशनमुळे होणारे आजार आणि त्वचेसंबंध होणाऱ्या समस्यांपासून वाचविण्याचे काम करतो.

महत्वाच्या बातम्या –

काँग्रेस नेत्यानं गर्लफ्रेंडला दिलेल्या ‘या’ अनोख्या गिफ्टची सगळीकडं चर्चा; वाचा काय आहे हे गिफ्ट

अंकिता लोखंडे म्हणते ‘धकधक करने लगा’, पाहा नेमकं काय झालंय!

गंदी बात! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडीओ, पोलिसांनी…

बिबट्यानं मगरीला जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं, शेवटी…; ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल

जाणून घ्या मनुका खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे