विश्वासघात केल्यामुळे शिवसेनेविषयी संताप आला; फडणवीसांनी सांगितली ‘ही’ २ कारणं!

मुंबई |  ऑक्टो. नोव्हेंबर 2019 ला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली. अन् त्यानंतर प्रत्यक्ष सरकार स्थापन व्हायला किती दीर्घ काळ सत्तासंघर्ष झाला ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं. पण दरम्यानच्या काळात शिवसेनेने भाजपशी असलेला 25 वर्षांचा संसार मोडत काँग्रेस राष्ट्रवादीशी नवा संसार थाटला होता. पण शिवसेनेने भाजपशी 25 वर्षांची दोस्ती का तोडली अन् त्यानंतर भाजपची मनस्थिती कशी झाली? याच विषयावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलते झाले आहेत. द इनसायडर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयावर सविस्तर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शिवसेनेने आमच्याशी असलेली युती तोडली याचा मला राग आला. त्याची दोन कारणे होती. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे उमेदवार जसे काही भाजपचे उमेदवार आहेत अशा पद्धतीने मी त्यांचं काम केलं. त्यांचा प्रचार केला. माझ्या पद्धतीने मला जेवढं शक्य आहे ते ते मी सगळं केलं. कारण मोदींजींना पंतप्रधान करायचं होतं.”

“विधानसभेच्या निवडणुकीवेळी देखील ज्या दिवशी फॉर्म माघारी घ्यायचे होते, त्यावेळी भाजपच्या बंडखोरांचे फ़ॉर्म माघारी घ्यायला बसलो. त्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि इतर मान्यवर माझ्याकडे आली होती. तेव्हा सकाळपासून सुमारे 5 तास मी फोनवर होतो. आमच्या बंडखोरांना मी फॉर्म परत घ्यायला सांगितले.”

“आमच्या जवळपास बऱ्याच लोकांनी माझ्या सूचनेचं पालन करत फॉर्म परत घेतले. त्याच वेळी आमच्याविरोधात सेनेचे बंडखोर तयार होतातयेतहे मात्र मी पाहिलं नाही. त्यावेळी मी अशी अट नाही टाकली की तुमच्या या उमेदवाराने माघार घेतली तर आमचा हा उमेदवार फॉर्म मागे घेईन. शिवसेनेने त्यावेळी प्रचंड बंडखोरी केली त्यामानाने भाजपची कमी होती. कारण मी जवळजवळ सगळे बंडखोर परत घेतले होते.”

“निवडणुकीत देखील मी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केलाच केला… पण शिवसेनेच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला.  माझे शिवसेनेशी जुने संबंध होते. अनेक जण खूप जवळचे होते.  शिवसेनेचे अनेक उमेदवार मला फोन करून त्यांच्या अडचणी सांगायचे. मग मी देखील आपला उमेदवार आहे म्हणून त्यांच्या अडचणी दूर करायचो. ”

“मी मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी मला काही गोष्टी सांगितल्या अन् मी त्या ऐकल्या नाही असं कधीच घडलं नाही. उद्धवजी देखील हे मान्य करतील. त्यामुळे साहजिकच मला सात्विक संताप आला. राग आला. पण शेवटी राजकारण आहे…. अशा गोष्टी मागे टाकायच्या असतात आणि पुढे जायचं असतं… ”

महत्वाच्या बातम्या-

-माझ्या नादी लागू नको नाहीतर तो व्हिडीओ… सोनू निगमची फिल्म इंडस्ट्रीतल्या या बड्या आसामीला धमकी

-मुख्यमंत्रिपद गेलं यावर विश्वास बसायला दोन दिवस लागले- देवेंद्र फडणवीस

-नवविवाहितेची आत्महत्या; अंत्यविधीवेळी पतीनं केलेलं कृत्य ऐकून काळजाचा थरकाप उडेल

-“तुमची अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत तर अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय”

-राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांना खुलं पत्र; पत्रात अनेक धक्कादायक आरोप