६४ एन्काउंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

पाटणा | बिहारच्या पोलिस विभागातील सेवानिवृत्त डीएसपी के. चंद्रा यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. के. चंद्रा यांच्या नावावर ६४ एन्काऊंटर केल्याची नोंद असून त्यांना ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणूनही ओळखलं जात होतं.

या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. आत्महत्येच्या ठिकाणी तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली आहे. या नोटमध्ये त्यांनी आत्महत्या करण्यामागील कारणांचा खुलासा केला आहे.

के. चंद्रा पत्रात लिहितात, ‘मला माफ करा. मानसिक तणावामुळं गेली कित्येक महिने मला झोपच लागत नाही. मला आता सगळं असह्य झालं आहे. म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. माझा मोबाईल मात्र चालू ठेवा कारण घरातील सगळ्या काही गोष्टींना हाच मोबाईल नंबर आहे.’

‘तब्बल १६ वर्ष मी या तणावात जगत आहे. यासाठी मी आजवर अनेक औषधोपचार करून पाहिले मात्र फरक काहीच पडला नाही. कॉलनीमधील संतोष सिन्हा याच्या त्रासामुळे मला जास्त असह्य झालं. त्यांच्या छळाला कंटाळूनच मी आत्महत्या करत आहे, असं पत्रात लिहीण्यात आलं आहे.

या सुसाईड नोटच्या मदतीनं पोलिस पुढील तपास करत आहेत. के. चंद्रा यांच्या जाण्यानं मात्र परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मराठी तरुणांनी तातडीनं कंपन्यांमध्ये जॉईन होण्याचा विचार करावा’

-शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे- गोपिचंद पडळकर

-“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं”

-‘या’ शहरात 30 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन; रुग्णसंख्या वाढत चालल्यानं पालिकेचा निर्णय

-मास्क न घालणाऱ्यांना आता 500 ते 1000 रुपये दंड; ‘या’ शहरात कारवाई सुरु