“मराठी तरुणांनी तातडीनं कंपन्यांमध्ये जॉईन होण्याचा विचार करावा’

पुणे | पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळं मराठी तरुणांनी तातडीनं कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अशी कळकळीची विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील अनेक परप्रांतीयांनी आपपल्या राज्यात स्थलांतर केलं होतं. मात्र आता लाॅकडाऊन शिथील झाल्यावर अनेक मजूरांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.  यामुळे संधी न दवडता मराठी तरुणांनी नोकऱ्या हाती घ्याव्यात, असं मत त्यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलं आहे.

काही तरूणांनी याआधीच संधी ओळखून नोकऱ्या मिळवल्या. मात्र मराठी तरुणांचा म्हणावा असा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. कुठलंही काम लहानमोठं कधीच नसतं. अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे.कोणतंही काम लहान-मोठं नसतं.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे- गोपिचंद पडळकर

-“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं”

-‘या’ शहरात 30 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन; रुग्णसंख्या वाढत चालल्यानं पालिकेचा निर्णय

-मास्क न घालणाऱ्यांना आता 500 ते 1000 रुपये दंड; ‘या’ शहरात कारवाई सुरु

-चीनसोबतच्या वादानंतरही ‘इतक्या’ टक्के लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास!