निवडणुकीपूर्वी राज्यात खळबळ; ‘या’ नेत्यानं राजकारणाला ठोकला रामराम

चेन्नई| तामिळनाडू मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सध्या चालू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच तामिळनाडूच्या राजकारणाला एक नवं वळण मिळालेलं पहायला मिळत आहे. तामिळनाडू निवडणुकीपूर्वी व्ही.के.शशिकला यांनी राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जवळच्या आणि एआयडीएमके पक्षाच्या नेत्या व्ही. शशिकला यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. शशिकला यांनी याबाबत एक निवेदन जारी केले असून आपल्या समर्थकांना आणि एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि डीएमके पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार आणि जयललिता यांच्या मार्गावर जाणार आहे. एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे आणि डीएमकेला निवडणुकीत पराभूत करावे.”

शशिकला यांनी तु.रुंगातून शि.क्षा भोगून आल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेतला आहे. तर श.शिकला या आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरण यांनी सांगितले होते.

शशिकला 28 जानेवारी रोजी एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षे तु.रुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्या आहेत. तेव्हापासून अशी अ.टकळ होती की सत्तारूढ एआयएडीएमके आणि वि.रोधी पक्ष डीएमकेला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आ.व्हान देतील.

शशिकला यांच्या जवळचे समजले जाणारे नातेवाईक जे इलावारसी तसंच जयललिता यांचा मानलेला मुलगा व्ही एन सुधाकरण यांनाही या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये करुणानिधी आणि जयललिता या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच राज्याची निवडणूक होत आहे. त्यामुळे कोणता पक्ष सत्तेत येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदा या निवडणुकीत प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्याही पक्षाने एन्ट्री केलीय. त्यामुळे त्यांचा पक्षही किती परिणाम करतो हे पाहावं लागणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; ‘या’ कारणामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गु.न्हा दाखल

‘इतक्या’ रुपयांनी महागलं सोनं, पाहा काय आहे आजचा भाव…

“ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार”

जाणून घ्या! काकडी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे राजयोग