भाजप नेते किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने खळबळ, म्हणाले…

मुंंबई | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) हे आता सोमय्यांच्या (Kirit Somaiya) निशाण्यावर आहेत. अनिल परब यांचा याअगोदरही ईडी चौकशी झाली होती.

अनिल परब यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेले पैसे याबाबत मंत्री अनिल परबांविरोधात भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा….चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, 30 मार्च रोजी सुनावणी होणार, असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

याअगोदर महाविकास आघाडी सरकारधील दोन मंत्र्यांना विविध प्रकरणांत आपलं मंत्रिपद गमवावं लागलं आहे. यात पहिलं नावं म्हणजे, माजी वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश आहे.

सध्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हेदेखील मनी लॉण्ड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. आता परिवहन नेते अनिल परब यांच्यावर कारवाई होऊ शकते असं ट्विट सोमय्यांनी केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

करदात्यांना मोठा दिलासा, निर्मला सितारमण यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आई हिराबेन यांची भेट; जेवतानाचे फोटो व्हायरल 

Russia-Ukraine War | पुतिन यांनी 70 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला 

मुंबईतल्या जोडप्याचा खुल्लम-खुल्ला रोमान्स; स्टेशनवर KISS करतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल 

“…तर उद्याच राजीनामा देतो, मला मंत्रिपदाने फरक पडत नाही”